१५ जानेवारी : भारतीय सैन्य दिन साजरा करण्याचे कारण

yongistan
By - YNG ONLINE

१२ महिने भारताचे सैनिक सीमेवर तैनात असतात. - ३२ डिग्री सेल्सिअस तापमान असो वा कितीही बिकट परिस्थिती असो भारतीय सैनिक डोळ््यात तेल घालून भारताचे रक्षण करतात. १५ जानेवारी रोजी ७६ वा भारतीय सैन्य दिन साजरा करण्यात आला.

भारतीय सैन्यातील महत्त्वाचे पद म्हणजे फिल्ड मार्शल. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश राजवटीत कमांडर इन चीफ जनरल फ्रांसिस होते. स्वातंत्र्यानंतर कमांडर इन चीफ हे पद कोडंडेरा मंडप्पा करियप्पा यांना देण्यात आले. हे पद जरी भारत सरकारने काही वर्षांपूर्वी रद्द केले असले तरी भारतातील फक्त दोन अधिका-यांना फिल्ड मार्शल हे पद देण्यात आले आहे. त्यातील एक फिल्ड मार्शल कोडंडेरा मंडप्पा करियप्पा आणि दुसरे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना देण्यात आले.
१९४७ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युध्दादरम्यान कोडंडेरा मंडप्पा करियप्पा यांनी पश्चिम सीमेवर भारतीय सैन्याचे नेतृत्व केले होते. १५ जानेवारी १९४९ ला कोडंडेरा मंडप्पा करियप्पा यांना भारतीय सेना प्रमुख ( कमांडर इन चीफ ) बनवले. म्हणून १५ जानेवारी हा दिवस आपण भारतीय सेना दिन म्हणून साजरा करतो. १९४९ साली भारतीय सैन्याची संख्या २ लाख होती. आज हीच संख्या १४ लाखांवर गेली आहे. यामुळे आपला भारत जगात चौथ्या स्थानावर पोहचला आहे. तसेच १५ जानेवारी १९७३ रोजी जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी लष्करप्रमुख म्हणून कारभार हाती घेतला होता. ते पहिले महाराष्ट्रीयन लष्करप्रमुख बनले.

भारतीय सैनिकांची 
काही विशेष कामे
सियाचीन ग्लेशियर येथील थंडी रक्त गोठवणारी आहे. तेथे दिवसा-२३ डिग्री सेल्सिअस तर -३२ डिग्री सेल्सिअस तापमान असते. भारतीय सेना जगातील सर्वोच्च उंचीवर सीमेचे रक्षण करणारी पहिली सेना आहे.
-२०१३ ला भारतीय वायुसेनाने ऑपरेशन राहत अभियान पार पाडले. या अभियानात ४६४० भारतीय आणि १००० इतर देशांचे नागरिक होते. ऑपरेशन राहत हे उत्तराखंड येथे आलेल्या त्सुनामीवर आपत्कालीन बचाव अभियान होते. 
-भारतीय सैनिकांच्या आर्टिलरी रेजिमेंट ही लढाईच्या वेळेस फायर पॉवर पुरवण्याचे काम करते. याचाच उपयोग कारगिल युध्दाच्या वेळेस भारतीय सैनिकांनी केला होता. हे युद्ध ६० दिवस चालू होते. कारगिल युद्धाच्या विजयामुळे भारताच्या एकूण सामर्थ्याच्या अंदाज संपुर्ण जगाला आला.
-पाकिस्तानसोबत आतापर्यंत भारतीय सेनेची ४ युद्ध झाली. चार ही युद्धांत भारतीय सैनिकांनी विजय संपादन केला. १९७१ झालेले युद्ध ही पाकिस्तानची सर्वात मोठी हार होती.
-जनरल ए ए खान नियाजी यांसह ९३००० सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. या युद्धानंतर पाकिस्तानचा भाग असलेला बांग्लादेश स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला.