राहुल गांधींची भारत छोडो न्याय यात्रा

yongistan
By - YNG ONLINE

इम्फाळ : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारी २०२४ रोजी मणिपूरमधून सुरू झाली. राज्यातील थौबल येथून रविवारी दुपारी १२ वाजता ही यात्रा सुरू झाली. खोंमजोम स्मारकाला वंदन करून त्यांनी ही यात्रा सुरू केली. १४ राज्ये, ६६ दिवस, ६७१३ कि.मी. बस आणि पायी प्रवास असणार आहे. १४ राज्यातील ११० जिल्ह्यांतून १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार असून, २० मार्च २०२४ रोजी मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे. 

राज्यनिहाय प्रवास 

मणिपूरमध्ये एका दिवसात ४ जिल्ह्यांमधून १०७ कि. मी.चा प्रवास
-नागालँडमधील ५ जिल्ह्यांतून २५७ किलोमीटरचा दोन दिवसांत प्रवास
-आसाम : १७ जिल्ह्यांत ८३३ कि.मी.चा प्रवास (८ दिवस)
-अरुणाचल प्रदेश : ५५ किमीचा प्रवास एका दिवसात
-मेघालय : 5 किमीचा प्रवास एका दिवसात
-पश्चिम बंगालमध्ये ७ जिल्ह्यांत ५२३ किमीचा प्रवास (५ दिवस)
-बिहारमध्ये ७ जिल्ह्यांतून ४२५ किमीचा प्रवास (४ दिवस)
-झारखंडमध्ये १३ जिल्ह्यांत ८०४ कि.मी. प्रवास ( ८दिवस)
-ओडिशात ३४१ कि.मी.ची यात्रा ४ जिल्ह्यांत (४ दिवस)
-छत्तीसगडमध्ये ७ जिल्हे ५३६ कि.मी. प्रवास (५ दिवस)
-उत्तर प्रदेश ११ दिवसांत २० जिल्हे १०७४ किमी. यात्रा
-मध्य प्रदेशात ७ दिवसांत ९ जिल्ह्यांतून ६९८ कि.मी. प्रवास
-राजस्थानमध्ये २ जिल्ह्यांत १ दिवसात १२८ किमीची यात्रा
-गुजरातमध्ये ५ दिवसांत ७ जिल्ह्यांत ४४५ किलोमीटरचा प्रवास
-महाराष्ट्रात ५ दिवसांत ६ जिल्ह्यांतून ४७९ किलोमीटरचा प्रवास आणि शेवटी २० मार्च रोजी मुंबईत या यात्रेचा समारोप होईल. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ही यात्रा सुरू झाल्याने या यात्रेला विशेष महत्त्व आहे.