१९ जानेवारी : इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान

yongistan
By - YNG ONLINE
 

जगातील महान संशोधकांपैकी एक जेम्स वॅट यांचा जन्म १९ जानेवारी रोजी झाला. बल्बसोबत वॅट हा शब्द का वापरला. वास्तविक वॅट हे शक्तीचे एकक आहे. जेम्स वॅट्सच्या योगदानाची ओळख म्हणून वॅटला पॉवरसाठी एसआय युनिट म्हणून निवडण्यात आले. तसेच आजच्याच दिवशी १९६६ मध्ये इंदिरा गांधी देशाच्या तिस-या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या होत्या. 

१७३६ :  वाफेवर चालणा-या आगगाडीचा जनक जेम्स वॅटचा जन्म

वाफेवर चालणा-या आगगाडीचा जनक म्हणून जेम्स वॅटला ओळखले जाते. आजच्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारी १७३६ रोजी त्याचा जन्म झाला. इंजिनाची शक्ती मोजण्यासाठी जेम्स वॅटने त्याची घोड्याच्या शक्तीशी तुलना केली. अशा प्रकारे हॉर्स पॉवर म्हणजे अश्वशक्ती ही संज्ञा प्रचारात आली. त्यानंतर एक अश्वशक्ती म्हणजे १ मिनिटात ३३ हजार पाऊंड वजन १ फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती हे मूल्य निश्चित केले. दाबमापकाने इंजिनाची अश्वशक्ती मोजली जाते आणि त्यानुसार इंजिनची किंमत ठरवली जाते. जेम्स वॅट्सच्या योगदानाची ओळख म्हणून वॅटला पॉवरसाठी एसआय युनिट म्हणून निवडण्यात आले. 

१८५५ : प्रसिद्ध पत्रकार आणि भारतातील प्रमुख विचारवंत जी. सुब्रमण्यम अय्यर यांचा जन्म

१९०५ : बंगाली लेखक देबेंद्रनाथ टागोर यांचा मृत्यू. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर हे देबेंद्रनाथ टागोर यांचे पुत्र होते.

१९२७ : ब्रिटनने आपले सैन्य चीनला पाठवण्याचा निर्णय घेतला.

१९४२ : म्यानमारवर जपानचा कब्जा

दुस-या महायुद्धादरम्यान जपानने म्यानमार ताब्यात घेतला. १९ जानेवारी १९४२ रोजी जपानने ब्रिटिशांना म्यानमारमधून हुसकावून लावले आणि म्यानमार ताब्यात घेतला. जपानला या कामामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेची मदत मिळाली. 

१९६६ : इंदिरा गांधी यांची भारताच्या तिस-या पंतप्रधान म्हणून निवड

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९ जानेवारी १९६६ रोजी पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधान म्हणून निवड झाली. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. जानेवारी १९६६ ते मार्च १९७७ पर्यंत आणि पुन्हा जानेवारी १९८० ते ऑक्टोबर १९८४ मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांनी १९७५ मध्ये आणीबाणीची घोषणा केली. १९८४ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवण्याच्या निर्णयामुळे नंतर त्यांची सुरक्षारक्षकांकडून हत्या करण्यात आली. 

१९६८ : पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी 
डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी आजच्याच दिवशी १९ जानेवारी १९६८ रोजी जगातील पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.