चीनविरोधी लाई चिंग ते तैवानचे अध्यक्ष

yongistan
By - YNG ONLINE
 बीजिंग : तैवानमधील सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोगेसिव्ह पार्टीचे नेता लाई चिंग ते यांनी शनिवार, दि. १३ जानेवारी २०२४ रोजी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. लाई चिंग-ते हे कट्टर चीन विरोधक समजले जातात. ते एका स्वतंत्र आणि लोकशाही देशाचे समर्थन करतात. त्यामुळे चीनसाठी हा मोठा धक्का आहे.
बीजिंगने याआधीच लाई चिंग ते यांना धोकादायक विभाजनवादी नेता ठरवले आहे. सध्या उपाध्यक्ष असलेले लाई चिंग ते यांच्यासमोर दोन प्रतिस्पर्धी होते. सर्वात मोठ्या विरोक्षी पक्षाचे होऊ यू इह आणि माजी तैयपैई महापौर को वेन जे या दोघांचा त्यांनी पराभव केला. लाई चिंग ते यांनी निवडून आल्यानंतर देशाच्या सुरक्षेबाबत कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त केली.
चीन आणि तैवान यांच्यामधील तणाव सर्वज्ञात आहे. चीनने कायमच तैवानवर आपला अधिकार प्रस्थापित करु पाहिला आहे. त्यादृष्टीने चीनची आक्रमक भूमिका पाहायला मिळते. या दोन देशात युद्धाची ठिणगी पडल्यास ती तिस-या महायुद्धाची नांदी असेल, असाही काहीजण अंदाज लावतात. लाई चिंग ते यांच्या विजयासह त्यांच्या डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीने सलग तिस-यांदा विजय मिळवत इतिहास रचला आहे. या घडामोडीमुळे चीन आणि तैवानमधील तणाव आणखी वाढण्याची भीती आहे. 
चीन आणि तैवानमधील वाद
तैवान चीनच्या दक्षिण पूर्व भागात १०० मैल दूर म्हणजे जवळपास १६० किलोमीटर अंतरावरील एक छोटे बेट आहे. परदेशी शक्तींपासून मुक्त झाल्यानंतर १९४९ पासून तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानत आला आहे. मात्र, आतापर्यंत जगातील केवळ १४ देशांनी त्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. मात्र, चीनला हे मान्य नाही, तर तो चीनचा अविभाज्य भाग मानला जातो. यावरून वाद आहे.