काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ५ न्याय, २५ गॅरंटी

yongistan
By - YNG ONLINE

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने दि. ५ एप्रिल २०२४ रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५ गॅरंटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये युवा, रोजगार, मजूर, महिलांना १ लाखांची मदत, शिक्षण, शेतक-यांना एमएसपीची हमी यासह ३० लाख नोक-या देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले. 
दिल्लीत पत्रकार परिषद घेत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा ‘ग्यान’ (जीवायएएन) या संकल्पनेवर अधारीत प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये जी-गरीब, वाय-युवा, ए (ए)- अन्नदाता, एन (एन)- नारी, अशी काँग्रेसची संकल्पना आहे.

जाहीरनाम्यात आश्वासने 
-तीस लाख युवकांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन
-आरक्षणाची मर्यादा वाढवविण्याचे आश्वासन.
-सरकारी नोक-यांमधील कत्रांटी धोरण रद्द करण्याचे आश्वासन.
-विद्यार्थ्यांचा छळ होऊ नये, म्हणून कायदा केला जाणार
-गरीब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देण्याचे आश्वासन
-शेतक-यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या धर्तीवर एमएसपीचे आश्वासन
-शेतक-यांंच्या पिकांचे नुकसान झाल्यास एका महिन्यात मदत मिळणार
-शेतक-यांच्या गरजेच्या सर्व गोष्टींवरील जीएसटी हटविण्याचे आश्वासन
-असंघटित कामगारांसाठी दुर्घटना वीमा योजना आणणार
-बेरोजगार भत्त्यासारख्या योजनांमध्ये चांगले पैसे थेट खात्यात देण्याचे आश्वासन
-अग्निवीर योजना बंद करून जुन्या पद्धतीने भरती राबविण्याचे आश्वासन
-पेपरफुटीचे प्रकार थांबविण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येणार
-गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचे आश्वासन
-पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन