१) ख्रिस गेल (६३) : ‘यूनिवर्स बॉस’ याने क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये विस्फोटक फलंदाजी केली. टी-२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणा-या फलंदाजात ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने टी-२० विश्वचषकात तब्बल ६३ षटकार ठोकण्याचा भीमपराक्रम केला. ख्रिस गेलने विश्वचषकात एकाच सामन्यात ११ षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. मुंबईत इंग्लंडविरोधात त्याने ११ षटकार ठोकले होते.
२) रोहित शर्मा (३५) : भारताचा कर्णधार रोहित शर्मा सर्वाधिक षटकार ठोकणा-या फलंदाजात दुस-या क्रमांकावर आहे. त्याने ३६ डावात ३५ षटकार ठोकले.
३) जोस बटलर (३३) : इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने २७ सामन्यात ३३ षटकार ठोकले. रोहित शर्माला मागे टाकण्यासाठी बटलरला फक्त दोन षटकाराची गरज आहे.
४) युवराज सिंह ( ३३) : भारताचा सिक्सर किंग युवराज सिंह टी-२० विश्चषकात सर्वाधिक षटकार ठोकणा-या फलंदाजात चौथ्या क्रमांकावर आहे. युवराजने टी-२० विश्वचषकात ३३ षटकार ठोकले. २००७ टी २० विश्वचषकात त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात सहा षटकार ठोकले.