१) शाकीब अल हसन (४७ विकेट) : बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन याचा हा नववा विश्वचषक आहे. त्याने विश्वचषकातील ३५ डावात ४७ विकेट घेण्याचा पराक्रम केला. शाकीब अल हसन आणि रोहित शर्मा हे दोनच खेळाडू असे आहेत की ते २००७ च्या टी-२० विश्वचषकात खेळत होते, ते या विश्वचषकातही खेळत आहेत.
२) शाहिद आफ्रिदी (३९ विकेट) : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने ३४ सामन्यात ३९ विकेट घेतल्या आहेत.
३) लसिथ मलिंगा (३८ विकेट) : श्रीलंकेचा यॉर्कर किंग लसिथ मलिंगाने ३१ सामन्यात ३८ विकेट घेतल्या.
४) सईद अजमल (३६ विकेट) : पाकिस्तानचा फिरकी गोलंजाज सईद अजमलने २३ सामन्यात ३६ विकेट घेतल्या आहेत.
५) अजंता मेंडिस (३५ विकेट) : श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अजंता मेंडिस याने २१ सामन्यात ३५ विकेट घेतल्या आहेत.