जेम्स अँडरसन 7 जुलैला होणार सेवानिवृत्त

yongistan
By - YNG ONLINE
लंडन : वृत्तसंस्था
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी जलद गोलंदाज जेम्स अ­ँडरसनने शनिवार, दि. ११ मे २०२४ रोजी निवृत्तीची घोषणा केली. ४१ वर्षीय ऍडरसन या वर्षी ७ जुलैला अखेरची कसोटी मॅच खेळणार आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणा-या लॉर्ड्स मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध अ‍ॅडरसनची अखेरची मॅच असेल. ही कसोटी मॅच १० ते १४ जुलै या काळात होईल. अ­ँडरसनने निवृत्तीची घोषणा इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत केली.  त्याने १८७ कसोटीत ७०० विकेट घेतल्या आहेत.


कसोटीत ७०० विकेट 
घेणारा एकमेव गोलंदाज
ऍडरसनने २००३ साली लॉर्डस मैदानावर पदार्पण केले होते. १८७ कसोटीत त्याने ७०० विकेट घेतल्या आहेत. कसोटीत ७०० विकेट घेणारा तो एकमेव जलद गोलंदाज आहे. अ­ँडरसनने या वर्षी भारताविरुद्ध धर्मशाला येथे झालेल्या कसोटीत कुलदीप यादवला बाद करून कसोटीतील ७०० विकेटचा टप्पा पार केला.

आंतरराष्ट्रीय करिअर
२००३ मध्ये इंग्लंडकडून पदार्पण करणारा अ­ँडरसन देशाकडून १९४ वनडे, १९ टी-२० आणि १८७ कसोटी खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ७०० विकेट घेणारा तो पहिला आणि एकमेव जलद गोलंदाज आहे तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजात तो तिस-या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे शेन वॉर्न (७०८ विकेट) आणि मुथय्या मुरलीधरन (८०० विकेट) हे दोन गोलंदाज आहेत. ऍडरसनने अखेरच्या कसोटीत ९ विकेट घेतल्या तर तो शेन वॉर्नला मागे टाकू शकतो आणि सर्वाधिक यशस्वी गोलंदाजांच्या यादीत तो दुस-या क्रमांकावर पोहोचू शकतो.