अमीर शेख यांनी कुवैतची संसद केली विसर्जित

yongistan
By - YNG ONLINE
कुवेत : वृत्तसंस्था
कच्च्या तेलाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेला आखाती देश म्हणून कुवेतची ओळख आहे. जगातील अतिश्रीमंत व अतिप्रगत देशांपैकी एक असलेल्या कुवेतमध्ये राजकीय भूकंप झाला असून शनिवार, दि. ११ मे २०२४ रोजी कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-सबाह यांनी संसद विसर्जित केल्याची घोषणा केली. त्यामुळे कुवेतमध्ये राजकीय संकट उभे राहिले आहे. 
कुवेत कठीण काळातून जात आहे. देशाचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि देशाचे हित सुरक्षित राखण्यासाठी कठोर निर्णय घेण्यास संकोच केला जाणार नाही, असे अमीर शेख संसद विसर्जित करण्याची घोषणा करताना म्हणाले. गेल्या काही वर्षांत देशातील अनेक विभागांत भ्रष्टाचार वाढला आहे. भ्रष्टाचारामुळे देशातील वातावरण बिघडले आहे. सुरक्षा, आर्थिक संस्था आणि न्याय व्यवस्थेतही भ्रष्टाचार वाढल्याचे ते म्हणाले. 
 देशाच्या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अमीर आणि देशाचे मंत्रिमंडळ नॅशनल असेंब्लीचे अधिकार स्वीकारतील. कुवेत अलीकडे काही कठीण परिस्थितीतून जात आहे. ज्याने देश वाचवण्यासाठी आणि त्याचे सर्वोच्च हित सुरक्षित करण्यासाठी कठीण निर्णय घेण्यास संकोच किंवा विलंब करण्यास जागा सोडली नाही, असे अमीर म्हणाले.

घटनात्मक कलम रद्द
संसद बरखास्त केल्यानंतर अमीर शेख यांनी काही सरकारी विभाग आपल्या नियंत्रणाखाली ठेवले आहेत. लोकशाही प्रक्रियेच्या सर्व पैलूंचा अभ्यास करण्यासाठी अमीराने काही घटनात्मक कलमांना ४ वर्षांपर्यंत रद्द केले आहे.