बीजिंगमध्ये जगातील पहिले एआय हाॅस्पीटल

yongistan
By - YNG ONLINE
बिजींग : वृत्तसंस्था
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय ने जगभरातील तंत्रज्ञानात मोठा बदल घडवून आणला आहे. तसेच एआयमुळे खूप सा-या गोष्टी सोप्या झाल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात अमूलाग्र बदल घडवणा-या एआयने आता वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स रुग्णालय सुरू झाले आहे. ‘एजंट हॉस्पिटल’ असे या रुग्णालयाचे नाव आहे. सिंघुआ विद्यापीठाच्या संशोधकांनी त्याची निर्मिती केली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स रुग्णालयात १४ एआय डॉक्टरांसह ४ परिचारिका आहेत. हे डॉक्टर दररोज ३ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम आहेत. या डॉक्टरांची रचना रोगांचे निदान करण्यासाठी, उपचार योजना तयार करण्यासाठी आणि परिचारिकांना दैनंदिन आधार देण्यासाठी करण्यात आली आहे. तसेच ही प्रणाली प्रथम वैद्यकीय विद्यापीठांना मदत करण्यासाठी वापरली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  संशोधकांच्या मते हे एआय डॉक्टर जगातील कोणत्याही प्रकारच्या साथीच्या रोगाचा प्रसार आणि त्यांचे उपचार इत्यादींबाबत माहिती देऊ शकतील.
इंधन भरण्यासाठी एआयची मदत
अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती येथील नॅशनल ऑइल कंपनीने वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स उर्फ एआयच्या मदतीने एआय रोबोट तयार केला आहे. हा एआय रोबोट इंधन स्टेशनवर अगदी सहजतेने वाहनांमध्ये इंधन भरण्यास सक्षम आहे. त्यामुळे ग्राहकांची सोय झाली आहे.