मोहन माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री

yongistan
By - YNG ONLINE
- शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती
भुवनेश्वर : मोहन माझी बुधवार, दि. १२ जून रोजी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते.उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रथमच आमदार प्रभाती परिडा आणि सहा वेळा आमदार झालेले केव्ही सिंग देव यांची निवड करण्यात आली. मोहन माझी हे एसटीसाठी राखीव असलेल्या केओंझार जागेवरून राज्य विधानसभेवर निवडून आले. ते आदिवासी नेते आहेत.

ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयासह भाजपने गेल्या २४ वर्षांपासून राज्यात असलेली बिजू जनता दलाची सत्ता उलथवून लावली. येथे १४७ जागांपैकी भाजपने ७८ जागांवर विजय मिळविला. त्यानंतर दि. १२ जून रोजी मोहन चरण माझी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री आणि १३ मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळात ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. 

नवीन पटनायक २००० पासून २०२४ पर्यंत म्हणजेच २४ वर्षे ९७ दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्यात पहिल्यांदाच भाजपचे सरकार सत्तेवर आले. माझी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पटनागचे आमदार के. व्ही. सिंग देव आणि निमापारा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक आलेल्या आमदार रेवती परिदा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल रघुबर दास यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.