चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

yongistan
By - YNG ONLINE

हैदराबाद : वृत्तसंस्था
तेलगु देशम (टीडीपी) पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी बुधवार, दि. १२ जून रोजी चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी पार्क येथे त्यांचा शपथविधी समारंभ पार पडला. या सोहळ््यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी सुपरस्टार पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि त्यांच्यासह २४ जणांनी शपथ घेतली. 
आंध्र प्रदेशात भाजपने तेलगु देशम आणि सुपर स्टार पवन कल्याण यांचा पक्ष जनसेना सोबत युती केली होती. या युतीला राज्यात १६४ जागा मिळाल्या. त्यात चंद्राबाबूंच्या टीडीपीला १३५, जनसेना पार्टीला २१ आणि भाजपला ८ जागा मिळाल्या. त्यामुळे जगनमोहन रेड्डी यांना मोठा धक्का बसला. 
नायडूंनी घेतला बदला
२०२१ मध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी नायडूंच्या पत्नीचा अपमान केला होता. त्यावेळी नायडू यांनी विधानसभेत वॉकआऊट होत मुख्यमंत्री झाल्यानंतरच विधानसभेत पाऊल ठेवू, अशी शपथ घेतली होती. अखेर नायडूंनी आज त्यांच्या अपमानाचा बदला घेतला. 
पवन कल्याण उपमुख्यमंत्री
दक्षिणेतील सुपरस्टार पवन कल्याण यांचीही या निवडणुकीत खूप चर्चा झाली. ते जनसेना पक्षाचे प्रमुख आहेत. ते आता आंध्रचे उपमुख्यमंत्री बनले. शपथविधीनंतर त्यांनी मोठा भाऊ चिरंजीवीच्या चरणाचा स्पर्श केला.