१) वैशाली रमेश बाबू तिसरी भारतीय ग्रँडमास्टर
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने भारतीय युवा बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू यांना ग्रँडमास्टर किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावल्ली यांच्यानंतर वैशाली तिसरी भारतीय ग्रँडमास्टर ठरली आहे. वैशालीने मागच्या वर्षी स्पेनमध्ये लोब्रेगेट ओपन स्पर्धेत ग्रँडमास्टरसाठी आवश्यक २५०० ईएलओ गुण प्राप्त केले.
२) पाणबुडीविरुद्ध क्षेपणास्त्र
ओडिशातील बालासोरच्या किनाºयावर सुपरसोनिक मिसाईल अॅसिस्टेड रिलीज आॅफ टॉरपीडो पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली. ही क्षेपणास्त्र आधारित हलक्या वजनाची टारपिडो डिलिव्हरी यंत्रणा आहे. डीआरडीओने ही डिझाईन विकसित केली आहे.
३) कृष्णा स्वामीनाथन नवे नौदलप्रमुख
व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी १ मे २०२४ रोजी नवे नौदलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. भारतीय नौदलात १ जुलै १९८७ रोजी त्यांची नियुक्ती झाली होती. ते तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक युद्धातील तज्ज्ञ आहेत. तसेच ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत.
४) वर्ल्ड हायड्रोजन समिट २०२४
वर्ल्ड हायड्रोजन समिटचे १३ ते १५ मेदरम्यान नेदरलँडमधील रॉटरडॅम येथे आयोजन करण्यात आले होते. भारताने पहिल्यांदा या आयोजनात भाग घेतला.
५) चाबहार बंदर करार
भारत आणि इराणमध्ये चाबहार बंदर चालविण्यासाठी बळ देण्याच्या उद्देशाने १० वर्षीय द्विपक्षीय कराराव स्वाक्षरी केली. हा निर्णय मध्य आशिया आणि युरोपमधील काही भागांच्या रणनितीचा भाग म्हणून हा करार करण्यात आला. चाबहार बंदर ओमानच्या खाडीत दक्षिण-पूर्व इराणमधील चाबहार येथे आहे.
६) जेम्स अँडरसनची निवृत्तीची घोषणा
इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स एंडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली. वेस्ट इंडिजच्या विरोधात लॉर्डस मैदानावर होणाºया कसोटी सामन्यात अँडरसन निवृत्त होणार आहे. अँडरसन ४२ वर्षांचा आहे. त्याने २००३ मध्ये झिम्बाम्ब्वेविरुद्ध लॉर्डस मैदानावरून आपल्या कसोटी सामन्याला सुरुवात केली ाहेती. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ७०० विकेट घेतल्या आहेत. यासोबतच एकदिवसीय सामन्यात २६९ बळी घेतले आहेत.
७) अमन सेहरावत आॅलिम्पिकसाठी पात्र
२०२४ च्या पॅरिस आॅलिम्पिकसाठी भारतीय कुस्तीपटू अमन सहरावत पात्र ठरला आहे. आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविणारा तो पहिला भारतीय कुस्तीपटू आहे. आशियाई चॅम्पियन इस्तंबुल, तुर्कस्तानमध्ये विश्व कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजन फ्रीस्टाईल गटात पात्र ठरला.
८) कामी रिता शेरपाची ऐतिहासिक कामगिरी
कामी रिता शेरपा ही जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट तब्बल २९ वेळा सर करणारी पहिली महिला ठरली असून, तिने इतिहास रचला. तिने १९९४ मध्ये पहिल्यांदा माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले होते.