अहमदनगर : प्रतिनिधी
भगवान गडाचे चौथे मठाधिपती म्हणून महंत नामदेव शास्त्री यांनी महंत कृष्णा महाराज शास्त्री यांची घोषणा सोमवार, दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी केली आहे. नामदेव शास्त्री यांनी महंत कृष्णा महाराज यांना आपले उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भगवानगड आहे. याच गडाचे मठाधिपती म्हणून महंत कृष्णा महाराज हे चौथे मठाधिपती राहणार आहेत. महंत नामदेव शास्त्री यांनी याबाबतची घोषणा केली. मुंडेंच्या दसरा मेळाव्यानिमित्त भगवानगड हा अधिक चर्चेत आला होता तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना या ठिकाणी दसरा मेळावा घेण्यास महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केला. त्यामुळे नामदेव शास्त्री यांच्यासह भगवानगड हा चांगलाच चर्चेत आला होता.