नोव्हेंबरचे जीएसटी संकलन १.८२ लाख कोटी

yongistan
By - YNG ONLINE
तिजोरी तुडूंब, नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनात ८.५ टक्के वाढ

नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था
डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ डिसेंबर २०२४ रोजी केंद्रातील मोदी सरकारला गुड न्यूज मिळाली असून नोव्हेंबर २०२४ मध्ये जीएसटी संकलन ८.५% ने वाढून १.८२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जीएसटी संकलनात दर महिन्यात वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारची तिजोरी अधिक मजबूत होताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यातदेखील जीएसटी संकलनात तब्बल ८.५ टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
 वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरच्या या संकलनामुळे एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण जीएसटी संकलन १४.५७ लाख कोटी रुपये झाले. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर २०२४ मध्येदेखील जीएसटी संकलनात ९% ची वाढ नोंदवली गेली होती. ऑक्टोबरचे एकूण संकलन १.८७ लाख कोटी रुपये होते, जे आतापर्यंतचे दुसरे सर्वात मोठे संकलन होते. त्यानंतर आता नोव्हेंबरमध्ये १.८२ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे.