विधान परिषदेच्या ६ आमदारांचे सदस्यत्व रद्द

yongistan
By - YNG ONLINE

मुंबई : वृत्तसंस्था
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण सहा आमदारांना विधान परिषदेत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातून गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी अधिसूचना काढण्यात आली आहे. सहाही विधान परिषद सदस्य हे आता विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्याने महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे प्रवीण दटके, आमश्या पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते. हे सर्व २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. ते आता विधानसभेत दाखल होणार आहेत. नियमानुसार एकावेळी एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नाही. त्यामुळे २३ नोव्हेंबरपासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.