कोकण रेल्वे महामंडळ इतिहासजमा

yongistan
By - YNG ONLINE
मुंबई : महाराष्ट्रासाठी कोकण रेल्वे महामंडळ महत्वाची संस्था होती. या महामंडळाने जगातील सर्वात खडतर मार्ग म्हणून ओळखल्या जाणा-या कोकण रेल्वे मार्गाची निर्मिती केली होती. रायगड जिल्ह्यामधील मध्य रेल्वेवरील रोहा स्थानक येथून कोकण मार्ग सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. २६ जानेवारी १९९८ रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी ७४१ किमी आहे. रेल्वे मॅन म्हणून जगभर प्रसिद्ध झालेले ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले अध्यक्ष होते. आता कोकण रेल्वे महामंडळ इतिहासजमा झाले आहे. या महामंडळाचे भारतीय रेल्वेत रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. १९ मार्च २०२५ रोजी दिली.
भविष्यातील प्रकल्पांसाठी तसेच आवश्यक निधीच्या तुटवड्याचे संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. 
कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या चार राज्यांच्या सहकार्याने झाली होती. मात्र, आर्थिक विवंचना आणि निधीअभावी महामंडळाला भविष्यातील प्रकल्प राबवण्यात अडचणी येत असल्याने या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला.