मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी मांडली. इतर राज्यातील आकडेवारीची तुलना केल्यास गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात आठवा तर शहरांमध्ये नागपूरचा सातवा क्रमांक लागतो, असे फडणवीस यांनी बुधवार, दि. १९ मार्च २०२५ रोजी सांगितले. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही देशातील प्रमुख राज्ये आपल्या पुढे असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
देशात महाराष्ट्र एक अतिशय महत्त्वाचे राज्य आहे. देशातील राज्यांची जर आपण तुलना केली तर गुन्हेगारीत महाराष्ट्राचा आठवा क्रमांक लागतो. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही काही महत्त्वाची राज्ये क्राइम रेटमध्ये आपल्या पुढे आहेत आणि आपण शहरांचा विचार केल्यास पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही. पहिल्या दहामध्ये सातव्या क्रमाकांवर आपल्याला नागपूर दिसते.
गुन्हेगारीत दिल्ली
पहिल्या क्रमांकावर
मुंबईसारखे शहर पंधराव्या क्रमांकावर आहे, पुणे १८ व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे, दुस-या क्रमांकावर जयपूर आहे. तिस-या क्रमाकांवर इंदूर आहे. चौथ्या क्रमांकावर कोची आहे. पाचव्या क्रमांकावर पाटणा आहे. गाझियाबाद, कोझीकोड आहे.